Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | solapur politics shivsena bjp

सोलापूर पालिकेत भाजप-सेना युती तुटली

प्रतिनिधी | Update - Mar 06, 2012, 01:16 AM IST

स्वीकृत नगरसेवकपदासाठी आवश्यक मते देण्यास भाजपने नकार दिल्याने युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेने सोमवारी येथे जाहीर केला.

 • solapur politics shivsena bjp

  सोलापूर - स्वीकृत नगरसेवकपदासाठी आवश्यक मते देण्यास भाजपने नकार दिल्याने युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेने सोमवारी येथे जाहीर केला. त्यामुळे महापालिकेचा कारभारात हे दोन्ही पक्ष स्वतंत्र कारभार करणार आहेत. सोमवारी स्वीकृत पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
  त्यात भाजप आणि सेनेने स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहे. सोलापूर महापालिकेत पक्षीय बलाबल पाहता आघडीचे तीन, तर युतीचे दोन स्वीकृत नगरसेवक निवडून येऊ शकतात. युतीच्या कोट्यातील दोनपैकी एक स्वीकृत नगरसेवक शिवसेनेचा
  करावा, अशी शिवसेनेची मागणी होती. ती भाजपने धुडकवून लावली. त्यामुळे भाजपने दोन्ही जागांवर उमेदवार दिले.
  भाजपने युतीचा धर्म न पाळता विश्वासघात केला आहे. त्यामुळेच वरिष्ठ पातळीवरून युती तोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मिकांत ठोंगे-पाटील यांनी दिली. दुसरीकडे भाजपचे विरोधी पक्षनेते सुरेश पाटील यांनी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिका-यांना युती तोडण्याचा अधिकारच नसल्याचे म्हटले आहे. भाजप-सेना युती तुटल्याने कॉँग्रेसचा अजून एक जादा स्वीकृत नगरसेवक निवडून येऊ शकतो.
  दरम्यान, स्वीकृत नगरसेवकपदासाठी काँग्रेसकडून अ‍ॅड. यू. एन. बेरिया व राजा खराडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपमध्ये मात्र,
  स्वीकृत नगरसेवकपदासाठी 8 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

  भाजप आमदार देशमुख यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा
  भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजप शहराध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षाकडे पाठवला आहे. भाजप शहराध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर आमदार देशमुख यांनी शहरात पक्ष वाढवला. त्याचे फलित म्हणजे महापालिका निवडणुकीत 12 जागांची भर पडत 25 नगरसेवक निवडून आले. महापालिका निवडणूक संपताच आमदार देशमुख यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा रविवारी प्रदेशध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठवला आहे. मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. यात कोणत्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे स्पष्टीकरण आमदार देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.Trending