आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solider Wives News In Marathi, Middle Man, Mhada

दलालांनी 19 वीर जवानांच्या पत्नींची केली फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - मुंबईतील म्हाडा गृहसंकुलात वीर जवानांच्या पत्नींची दलालांनी फसवणूक केल्याचा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय संस्थेने केला आहे. 19 पैकी 10 वीरपत्नींच्या तक्रारी मिळाल्या असून या दलालांवर तातडीने
कारवाई करावी, अशी मागणी संस्था आणि 10 वीरपत्नींनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली आहे.


साता-याच्या एस. जी. रसाळ आणि मुंबईच्या शशिकांत कदम यांनी कागदपत्रे वाचून न दाखवता वीर पत्नींच्या सह्या, अंगठे घेतले. या वेळी सदनिका मंजूर झाल्याचे त्यांना सांगितले नाही व सदनिकांची परस्पर विक्री केल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय संस्थेचे विजय वन्ने यांनी सांगितले. घराबाबत विचारले, तर पाच लाख रुपये देऊ, असे सांगत कोठे बोलला, तर मारून टाकण्याची धमकी दिली. महिलांनी 29 फेब्रुवारी 2012 रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांना तसेच मुंबईत खेरवाडी येथेही अर्ज दिला आहे. मात्र, काहीच झाले नाही. त्यामुळे या दोघांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.