आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडिलांच्या कारखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू; सांगलीतील धक्कादायक घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील हरिपूरमध्ये वडिलांच्या कारखाली चिरडून सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना झाली आहे. शिवम गंगथडे असे मृत मुलाचे नाव आहे.

 

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शिवमचे वडील सतपाल गंगथडे यांनी काल (सोमवार) संध्याकाळी शिवमला गाडीत बसवून परिसरातून फिरवून आणले. फिरवून आणल्यानंतर त्यांनी शिवमला घरात सोडले आणि कामानिमित्त ते बाहेर निघाले. मात्र, शिवम हा घरात न जाता वडिलांच्या पाठोपाठ आला. त्याचवेळी सतपाल कार मागे घेत असताना शिवमला चाकाखाली सापडला. त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...