Home »Maharashtra »Western Maharashtra »Kolhapur» Spaecial Placemaybach Car In Shahi Dasra In Kolhapur

शाही कुटुंब आणि कोल्‍हापूरकरांची अविभाज्‍य भाग बनली ही कार, हिटलर होता मोठा चाहता

दिव्‍य मराठी वेब टीम | Oct 01, 2017, 12:23 PM IST

  • मेबॅक मधून सोने लुटताना छत्रपती घराणे.
कोल्‍हापूर-100 वर्षांपूर्वी जंगबहाद्दूर हत्ती कोल्हापूरच्या शाही दसर्याच्या अग्रस्थानी असायचा, जंगबहाद्दूर नंतर हि जागा 'मेबॅक' या आलिशान जर्मन कारने घेतली. 100 पासून दसऱ्याला राजघराण्यातील मंडळींना घेऊन येणारी मेबॅकची क्रेज विजयादशमीच्या दिवशीही कोल्हापूरकरांनी अनुभवली.
'मेबॅक DS8 झेपलिन' अस पूर्ण नाव असलेली हि एकमेव कार भारतात उपलब्ध आहे आणि जगभरात अशा फक्त ४-५ कार आहेत. मेबॅक कंपनीने अशा फक्‍त 100 कार्सचे उत्‍पादन केले होते. त्‍यावेळी जगात फक्त काही मोजके राजे, सुलतान राष्ट्राध्यक्ष, लष्करशहा यांच्यातच हि ऐपत होती कि ते हि कार विकत घेऊ शकतील. कंपनीनेही 'प्रोफाईल' बघूनच या कार्स विकल्या.
1932 साली छत्रपती राजाराम महाराजांनी खरेदी केली कार
१९३२ साली छत्रपती राजाराम महाराजांनी मेबॅक कार ऑर्डर देऊन लंडनमधून खरेदी केली. संस्थानाच्या ध्वजाचा रंग केशरी असल्याने केशरी रंगाच्या कारची ऑर्डर देण्यात आली. बॉनेटच्या पुढे महालक्ष्मी मूर्ती असून ,कारच्या मधल्या हेडलाईटवर भवानी आणि शिवराय असे संस्थानाचे चिन्ह कंपनीकडून तयार करवून घेतले. आजतागायत या गाडीची एकदाही दुरुस्ती झाली नाही. अत्यंत उत्कृष्ठ स्थितीत आणि अतिशय दुर्मिळ असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात या कार ची किंमत सुमारे ४० कोटी (६.५ Million $ ) आहे.
हिटलरची आवडती कार
जर्मनी मध्ये त्या काळात अडोल्फ हिटलर चा उदय झाला होता, तो मेबॅक कार्स चा प्रचंड मोठा चाहता होता. पण मेबॅक सारख्या अल्ट्रालक्झरी कार्स सामन्यांच्या आवाक्यातल्या नाहीत हि रुखरुख त्याला होती आणि त्यातूनच Volkswagen ('सर्वसामान्यांची कार' ) चा जन्म झाला.Volkswagen च्या बीटल कार ची संपूर्ण संकल्पना अडोल्फ हिटलर ची होती आणि या प्रोजेक्ट चा लीड होता फर्डिनांड पोर्श. बीटल हि खर्या अर्थाने सर्वसामान्यांची कार ठरली कारण किंमत होती फक्त ८५ पौंड आणि अश्या २.५ कोटी बीटल्स जगभर विकल्या गेल्या.
कोल्‍हापूरचा अविभाज्‍य भाग बनली कार
राजाराम महाराजांच्या नंतर शाहू महाराज,संभाजीराजे,मालोजीराजे हे ही या मेबॅक ची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतात. मेबॅक कार जशी कोल्हापूरकरांच्या आणि छत्रपतींच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. तशीच हि कार जगभरातल्या मोठ्या कार ब्रान्ड्सची जनकही बनली.
1909 साली मेबॅक कंपनीची स्‍थापना
विल्हेम मेबॅक यांनी १९०९ साली मेबॅक कंपनीची स्थापना केली होती ,गॉटलिब डैम्लर त्यांचे सहकारी मित्र होते तर यांच्या कंपनीत फर्डिनांड पोर्श हा डिजाइन इंजिनियर म्हणून होता. त्यादरम्यानच कार्ल बेंझ आणि डैम्लर यांनी मर्सिडीज बेंझ कंपनीची स्थापना केली. फर्डिनांड पोर्श नेही वेगळे होत पोर्श मोटर्स चालू केली. डैम्लर आणि त्यांच्या मुलांने ऑडी आणि BMW च्या स्थापनेतही हातभार लावला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, हिटलर फोक्सवॅगनचे उद्घाटन करताना

Next Article

Recommended