आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवर्तन : बसस्थानकांचा चेहरामोहरा लवकरच पालटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - राज्यातील 40 वर्षांहून अधिक जुन्या बसस्थानकांचे बीओटी तत्त्वावर नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. एसटीला संजीवनी देण्यासाठी नवीन वर्षात पंचसूत्री कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोरे म्हणाले, ‘सरकार आणि महामंडळाच्या संयुक्त सकारात्मक प्रयत्नातूनच एसटीला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात. आम्ही आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील बससेवेचा अभ्यास केला. त्याप्रमाणे आपल्याकडेही काही नवे उपक्रम, योजना राबवल्या जातील. आपण विविध वर्गातील प्रवाशांना 23 प्रकारच्या सवलती देतो, त्यांच्याकडे तशा योजना नाहीत. आपली एसटी सामाजिक बांधिलकीने काम करते; ते तिकडे पाहायला मिळत नाही.’
‘अनेक शहरांतील बसस्थानके 40-50 वर्षांपूर्वीची आहेत. बसस्थानकांच्या जागेचा व्यापारी उपयोग करणे शक्य असेल अशा शहरांतील बसस्थानकांचे बीओटी तत्त्वावर नूतनीकरण करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, त्याला शासनानेही मंजुरी दिली आहे. अशा 125 बसस्थानकांचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे, त्यामध्ये औरंगाबाद, पनवेल, कराड, सांगली, रत्नागिरी, अकोला, नाशिक रोड अशा 50 स्थानकांचा बीओटी तत्त्वावर विकास करण्यात येणार आहे.
0वाहक-चालकांकडून प्रवाशांना सौजन्याची वागणूक
0यापुढे 200 किमी प्रवासासाठीही प्रासंगिक करार
0ज्येष्ठांसाठी ऑनलाइन बुकिंग व्यवस्था
0विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मागेल तिथे बस
0बस आणि बसस्थानकांची अंतर्बाह्य स्वच्छता
स्वयंचलित बस स्वच्छता यंत्रणा
‘‘सफाई कामगारांची कमतरता असल्याने राज्यातील 248 आगारांमध्ये स्वयंचलित बस स्वच्छता करण्याची यंत्रणा बसवण्यात येणार आहे. याशिवाय सर्व डेपो, विभागीय कार्यालये, बसस्थानके यांचे संगणकीकरण करण्यात येणार असल्याचे जीवनराव गोरे यांनी सांगितले.