आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरच्या स्थायी सभापतीला पुन्हा पोलिस कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांचा जामीन रद्द झाल्याने त्यांची पुन्हा पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत नोकरी लावतो म्हणून ज्या अमोल पोतदार यांने लाखो रूपये गोळा केले त्याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याबाबचा गुन्हा देशमुख यांच्याविरोधात येथील राजारामपुरी पोलिसात दाखल आहे.
गेले चार महिने देशमुख फरार होते. पंधरा दिवसांपूर्वी ते न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळीही त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. यांनतर त्यांना जामीन मिळाला होता. यानंतर त्यांनी स्थायी समितीच्या दोन सभांनाही उपस्थिती लावली. परंतु त्यांचा जामीन रद्द व्हावा यासाठी याचिका दाखल झाली होती. याबाबत निर्णय होवून देशमुख यांना पुन्हा दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.