आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Behind To Take Advantage From Various Scheme;pawar Disappointe

योजनांचा लाभ घेण्यात राज्य मागे ;शरद पवार यांची खंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - दुष्काळी भागातील प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहेत. केंद्र सरकार पाण्यासाठी अनेक योजना जाहीर करते, मात्र राज्यात त्याचा फायदा घेण्याचे प्रमाण कमी दिसते. दुष्काळी भागात फळबागांसाठी टँकरने पाणीपुरवठ्यासाठी कर्जाची योजना आहे. यातील काही व्याजही केंद्र सरकार फेडणार होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी व्यक्त केली.
सातारा येथील दुष्काळ आढावा बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री रामराजे निंबाळकर, पुण्याचे विभागीय आयुक्त विकास देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.
विजेचे बिल भराच
‘यंदाचा दुष्काळ भयावह आहे. त्यामुळे यापुढे पाणी काटकसरीने वापरायला हवे. गाळ काढण्याचे प्रकल्प, केटी बंधारे, डागडुजी करण्याचे काम किंवा चारा-वैरण निर्माण करणारे उपक्रम केले तर दुष्काळाची तीव्रता कमी होईल. शेतकरी जी वीज वापरतो त्याचे योग्य ते पैसे त्याने द्यायलाच पाहिजेत. त्याशिवाय वीजनिर्मितीसाठी येणारा खर्च कसा भरून निघेल?’ असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.
पंतप्रधानांना भेटणार
दुष्काळी परिस्थितीबाबत आपण आणि मुख्यमंत्री पुन्हा पंतप्रधानांची भेट घेऊन महाराष्ट्राला जादा निधी देण्याची विनंती करणार आहोत. विविध कामांसाठी योजनांची अंमलबजावणी केली जाईल, असेही पवारांनी स्पष्ट केले.
अधिका-या ची गय नाही
अर्थसंकल्पात दुष्काळ निवारणाच्या कामासाठी प्राधान्य दिले जाईल. हलगर्जीपणा करणा-या अधिका-याची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. राज्याने केंद्राकडे 2200 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यपालांच्या धोरणांची चौकट सांभाळून राज्याच्या अंदाजपत्रकातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.