आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांनो, वाद नको, संयम बाळगा- अजित पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- राज्यातील दुष्काळी परिस्थिती, दहावी-बारावीच्या परीक्षा यासारखे अनेक गंभीर विषय असताना कोणावर टीका-टिप्पणी करण्यात आपल्याला स्वारस्य नाही. प्रत्येक नेत्याला आपला पक्ष राज्यभर वाढवण्याचा अधिकार नाही. कोणी काहीही बोलले तरी जनता शहाणी आहे, समंजस आहे. त्यामुळे यापुढे कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले.
सातारा येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर नगरमध्ये राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी हे प्रकार बंद करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
दरम्यान, दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक साखर कारखान्याने एक टन ऊस गाळपामागे 10 रुपयांचा निधी द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आटपाडी (जि. सांगली) येथे केले. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यास सरकार कटिबद्ध आहे. त्यात कारखान्यांनी
योगदान द्यावे, असे पवार म्हणाले.