आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Government Action On Kolhapur Mayer Trupti Malvi

कोल्हापूरच्या तृप्ती माळवी यांचे महापौरपद रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- तृप्ती माळवी यांचे महापौर नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिला असून तसा आदेश गुरुवारी मनपाला मिळाला आहे. ३० जानेवारी २०१५ रोजी स्वीय सहायकामार्फत १६ हजार रुपयांची लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. राष्ट्रवादीच्या सदस्य माळवी यांना त्याच दिवशी सोडून देण्यात आले. त्यानंतर त्या रुग्णालयात दाखल झाल्या. अखेर सात दिवसांनी त्यांना अटक करण्यात आली. याबाबत दिवसांपूर्वी राज्यमंत्री पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात माळवी यांचे महापौर नगरसेवक पदही रद्द करण्यात आले आहे.