आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Home Minister Followers Murder In Kolhapur

पाचगावमध्ये सूडनाट्य : गृह राज्यमंत्री पाटील यांच्या समर्थकाच्या मेहुण्याचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा कट्टर सर्मथक असलेला दिलीप जाधव याच्या मेहुण्याचा तलवार व गुप्तीने रविवारी रात्री खून करण्यात आला. यामुळे कोल्हापूरला लागूनच असलेल्या पाचगावमध्ये तणाव निर्माण झाला असून या सूडनाट्यामुळे तेथे पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.
दहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिक यांचे सर्मथक असलेले पाचगावचे माजी सरपंच अशोक पाटील यांचा दिवसाढवळय़ा गोळय़ा घालून कोल्हापुरात खून झाला होता. याचा सूड उगवण्यासाठीच हा खून झाल्याचा आरोप मृत धनाजी गाडगीळ याच्या नातेवाइकांनी केला असून रविवारी रात्री सीपीआर रूग्णालय परिसरातील वातावरणही तणावपूर्ण बनले होते.
गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात गेल्या विधानसभेपासून जोरदार वैमनस्य निर्माण झाले असून त्याचे पडसाद अजूनही उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, धनंजय महाडिक यांना अटक करा, अशी मागणी महाडिक युवाशक्तीच्या पदाधिकार्‍यांवरही गाडगीळ यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे.