आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Home Minister R R Patil Comment On Naxlislist

नक्षलींचे खरे सूत्रधार शहरातच : आर. आर. पाटील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- नक्षली चळवळ चालवणारे खरे सूत्रधार शहरांतच आहेत. जंगलात बंदुका चालवणार्‍या तरूणांना विचार आणि शस्त्रास्त्रांची रसद शहरांतूनच पुरवली जाते; मात्र या सूत्रधारांना पकडण्यासाठी कायदे कमी पडतात’, अशी खंत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सोमवारी व्यक्तकेली. नक्षलवाद्यांनी मला धमक्या दिल्या तरी त्याचा या भागातील विकासकामांवर काहीही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत नक्षलग्रस्त भागांत पोलिसांनी कारवाया वाढवल्या आहेत. विकासकामांनाही गती मिळाली आहे. त्यामुळे नक्षली वैफल्यग्रस्त झाले आहेत. यातूनच त्यांनी मला धमकीचे पत्र पाठवले. बंदुका चालवून नक्षलवाद संपणार नाही. तेथील दारिद्रय संपवण्यासाठी आम्ही सर्व पातळींवर प्रयत्न करत आहोत. नक्षलवाद्यांशी चर्चा करायचीही आमची तयारी आहे. मात्र ते तयार नाहीत. केंद्र शासनानेही नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी मोठी मदत केली आहे. मात्र आदिवासी तरूणांना विचार आणि शस्त्रांचे बळ देणारे शहरांत राहतात. त्यांना पकडण्यासाठी कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.