आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील उद्योजकांसाठी कर्नाटकच्या पायघड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - विजेचे वाढते दर आणि विविध करांच्या ओझ्याखाली दबणा-या महाराष्‍ट्रातील उद्योजकांसाठी कर्नाटक शासनाने पायघड्या घातल्या असून 31 जानेवारीला कर्नाटकचे उद्योगमंत्री प्रकाश हुक्केरी यांच्यासमवेत राज्यातील उद्योजकांची बैठक होणार आहे.
गेल्या वर्षभरापासून कर्नाटक शासनाने कोल्हापूर, सांगली, सोलापूर व अन्य जे जिल्हे कर्नाटकशेजारी आहेत अशा परिसरातील उद्योजकांना कर्नाटकात उद्योगासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय दुधाणे यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी बेळगाव येथे जाऊन कर्नाटकचे उद्योग सहसंचालक के. पी. परमेश्वराप्पा यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानुसार महाराष्‍ट्र कर्नाटक सीमाभागात महाराष्‍ट्रातील उद्योजकांना एकरी आठ लाख रुपये दराने 30 वर्षांसाठी भूखंड उपलब्ध करून देणे, नंतर तो मालकीचा होणे, कमी दरात वीजदर देणे याबाबत उद्योगमंत्र्यांशी चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्‍ट्र शासनाची अनास्था : उद्योगासाठी लागणा-या विजेचे वाढते दर, पाणीपट्टीसह विविध प्रकारचे कर, पायाभूत सुविधांचा अभावासाठी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला तरीही शासन काहीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे उद्योजक कर्नाटकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.