Home »Maharashtra »Western Maharashtra »Kolhapur» State Irrigation Minister Hasan Mushrif News In Marathi, Kolhaour

मंत्री मुश्रीफांच्या घरातच ७६ बोगस मतदार, संजय घाटगे यांचा आरोप

राज्याचे जलसंपदा मंत्री बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या, भावाच्या आईच्या नावे असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घरांच्या पत्त्यावर २० वेगवेगळी आडनावे असलेल्या ७६ मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

दिव्य मराठी नेटवर्क | Sep 13, 2014, 09:35 AM IST

  • मंत्री मुश्रीफांच्या घरातच ७६ बोगस मतदार, संजय घाटगे यांचा आरोप
कोल्हापूर- राज्याचे जलसंपदा मंत्री बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या, भावाच्या आईच्या नावे असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घरांच्या पत्त्यावर २० वेगवेगळी आडनावे असलेल्या ७६ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. याबाबत निवडणूक आयोगानेही बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप मुश्रीफ यांचे विरोधक माजी आमदार संजय घाटगे यांनी केला आहे. घाटगे हे मुश्रीफ यांच्याविरोधात विधानसभा लढवणार आहेत.

घाटगे यांनी सांगितले की, कर्नाटकातील निपाणी ही मुश्रीफ यांची सासुरवाडी आहे. तेथील संकेश्वर येथील अनेक जणांचा या कागलच्या मतदारयादीत समावेश आहे. यातील अनेकांचा कर्नाटक राज्याच्या मतदार यादीतही छायाचित्रासह समावेश आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर यातील काहींना बोलावून तुम्ही कागलमध्ये मतदान करणार का कर्नाटकात? असे विचारले. या सर्वांनी आम्ही कागलमध्ये मतदान करणार असे सांगितल्यावर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. मात्र ही बोगसगिरी असल्याचाही आरोप घाटगे यांनी केला आहे. अशी ७०० नावे मतदार यादीत घुसवल्याचा आरोप त्यांनी केला.
(फोटो: जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ)

Next Article

Recommended