आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Minister Ajit Pawar In Karad, Yashwantrao Chavan Samadhi

अजित पवारांच्या \'गांधीगिरी\'वर शरसंधान; खरंच पश्चाताप झाला असेल तर राजीनामा द्या- राज ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा/ मुंबई - दुष्काळग्रस्तांवर केलेल्या बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता 'गांधीगिरी' सुरु केली असली तरी त्याचा काही फायदा होणार नाही. अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आहे.

आता पश्चाताप करून काहीही फायदा नाही. "जो बुंद से गई, ओ हौद से नही आती", अशीही टीका राज ठाकरेंनी पवारांवर केली आहे.

अजित पवार आज (रविवारी) कराड येथे आत्मक्लेश उपोषणाला बसले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाजवळच ते आज दिवसभर बसणार आहेत. परंतु अजित पवारांचे आत्मक्लेश उपोषण हे केवळ नौटंकी असल्याची चौफेर टीका होताना दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने पवारांची पाठराखण केली आहे. माफी माग‍ितल्याने हा विषय आता थांबावला पाहिजे, अशी भूमिका राष्‍ट्रवादीने घेतली आहे.

दुसरीकडे अजित पवारांच्या आत्मक्लेश उपोषणाविरोधात सातार्‍यात शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. दत्त चौकात शिवसैनिकांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर यशवंतराव चव्हाण यांच्या पायाशी बसून अजित पवारांना सुबुद्धी सुचेल, अशी टीका भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. तर अजित पवारांनी हिरवळीवर न बसता समाधीजवळ उन्हात बसावे. तेव्हा त्यांना उन्हाचे चटके काय असतात हे कळेल.

नौंटंकी बंद करा आणि आधी राजिनामा द्या, अशी घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनीही समाधीस्थळाच्या बाहेर आंदोलन सुरु केले आहे.

सामाजिक जीवनात जे काही घडले त्याच प्रायश्चित्त घेण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे पवारांनी स्पष्‍ट केले असले तरी ते नौटंकी करत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली. तर पवारांनी आता पश्चाताप करून कांही उपयोग नाही.

अजित पवारांनी कराडमध्ये सुरु असलेला प्रकार हा 'गांधीगिरी' नसून ही त्यांची 'टगेगिरी' असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेता विनोद तावडे यांनी केली आहे. अजित पवार यांना खरंच प्रायश्चित्त करायचे असेल तर त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. राजीनामा दिल्यानंतर एक वर्ष दुष्काळ भागासाठी काम करावे. असेही तावडेंनी म्हटले आहे.

अज‍ित पवारांचे आत्मक्लेश आंदोलन हे 50-50 आहे. 50 टक्के आत्मक्लेष उपोषण आणि 50 टक्के नौटंकी असल्याची टीका आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केले आहे.

अज‍ित पवार आपल्या बेताल वक्तव्याबद्दल प्रायश्चित्त करत असले तरी विरोधक त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत.

अज‍ित पवारांचे उपोषण म्हणजे ढोंग- प्रभाकर देशमुख, उपोषकर्ते
उजनी धरणातील पवित्र पाण्‍याची अजित पवारांनी खिल्‍ली उडवून त्याच्या अपमान केला आहे. पवार यांनी तमाम सोलापूरातील दुष्‍काळगस्तांची माफी मागावी.

खरंच प्रायश्चित्त असेल तर अजित पवार राजीनामा देतील : अं‍जली दमानिया , आम आदमी पार्टी

दरम्यान, 'जो काम करतो तो चुकतो. त्यामुळे आपल्या चुकीबद्दल प्रायश्चित्य घेण्याचे ठरविलेय. मला जे वाटले ते मी करण्यासाठी येथे आलोय. मला काही प्रसिद्धी मिळवायची नाही. नाहीतर मी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले असते. तसे मी केलेले नाही. आपल्या राजकीय जीवनात असं काहीतरी करावसं वाटल म्हणून मी कराडमध्ये आलोय,' असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.