आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर - ‘पेट्रोलमध्ये 5 टक्के इथेनॉल मिसळण्याची परवानगी द्या, अशी मागणी आम्ही गेली अनेक वर्षे करत आहोत; परंतु शासन त्याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे या मागणीसाठी आता उग्र आंदोलन छेडण्यात येईल. मनमाड आणि लोणी येथे जे पेट्रोल आणि डिझेल रेल्वेच्या माध्यमातून आणले जाते तेच रोखून राज्याचा इंधन पुरवठा थांबवण्यात येईल,’ असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी
मंगळवारी दिला.
शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित इथेनॉल परिषदेत ते बोलत होते. पाटील म्हणाले की, शेतक-यांच्या खिशात चार पैसे जावेत यासाठी इथेनॉल हा चांगला पर्याय असताना केंद्र सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आम्हाला कुठे नाक दाबायचं ते माहीत आहे. म्हणूनच मनमाड आणि लोणी येथे आंदोलन करणार आहोत.
उसाची पहिली उचल 3500 रुपयेच हवी
‘यंदा उसाची पहिली उचल 3500 रुपये द्यायला हवी,’ अशी मागणी रघुनाथ पाटील यांनी केली आहे. शेतक-यांचे नुकसान करून हंगाम सुरू करू दिला जाणार नाही. आम्ही मागणीवर ठाम आहोत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.