आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, भांडणातून काही मिळत नाही, शांत राहा -उदयनराजे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाडीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घडना घडली आहे. उदयनराजे भोसले मंगळवारी सायंकाळी जावळी तालुक्यात निवडणुकीच्या मतदानाचा आढावा घेण्यासाठी गेले असता खुर्शी मुरा गावात ही घटना घडली.

दरम्यान, आपण बांगड्या भरलेल्या नाहीत, भांडणातून काही मिळत नाही, कार्यकर्त्यांनी शांत राहावे, असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले आहे. 

मिळालेली माहिती अशी की, उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे म्हसवे गटातील उमेदवार वसंत माणकुमरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खुर्शी गावात क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. नंतर कार्यकर्ते हमरीतुमरी आले. माणकुमरे समर्थकांनी उदयनराजे यांच्या गाडी ताफ्यावर दगडफेक केली. यात उदयनराजे यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या राजू गोळे यांचीही गाडी फोडली.

घटनेनंतर उदयनराजे तातडीने साताऱ्याकडे निघाले. मात्र, त्यांचे धाकटे बंधू आणि कट्टर राजकीय शत्रू आमदार शिवेंद्रराजे भोसले हे घटनास्थळी पोहोचले. उदयनराजे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.  

उदयनराजे यांनी वसंत माणकुमरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच ते दहशत माजवण्यासाठी जावळीत आले होते, असा आरोप आमदार शिवेंद्रराजे यांनी केला आहे. 
दुसरीकडे, उदयनराजे भोसले यांनी सातारा शहर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दगडफेक करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. आपण बांगड्या भरलेल्या नाहीत, भांडणातून काही मिळत नाही, कार्यकर्त्यांनी शांत राहावे, असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले आहे. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...