कोल्हापूर - मेडिकलच्या अॅनाटॉमी विषयात सतत नापास होत असल्याने औरंगाबादच्या विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन सोमवारी आत्महत्या केली. श्रद्धा गंगाधर कारे (२२, राजगडनगर, सडिको, औरंगाबाद) असे तिचे नाव आहे.
राजर्षी शाहू कॉलेजात ती एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला होती. सोमवारी सकाळी १० वाजता श्रद्धाचा अॅनाटॉमीचा पेपर होता. पहाटे ४ वाजेपर्यंत ती अभ्यास करत होती. आठच्या सुमारास तिला फोन आला. फोनवर बोलत चौथ्या मजल्यावरून ती पाचव्या मजल्यावर गेली. नंतर उडी घेतली. कर्मचा-यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुपारी ४ वाजता तिचा मृत्यू झाला. नैराश्याच्या आजारात घेतल्या जाणा-या गोळ्या श्रद्धाच्या खोलीत सापडल्या. पोलिस तिचे
मोबाइल कॉल डिटेल्स तपासत आहेत.