आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : स्वत:ला श्रद्धांजली अर्पण करून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - शहरामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणा-या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. महादेव कुंभार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी स्वत:चे एक पोस्टर तयार करून सोशल मिडियाच्या (व्हॉट्सअप) माध्यमातून मित्रांना पाठवले होते.
या तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर या विद्यार्थ्याने स्वत:लाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि हे पोस्टर सर्वांना फॉरवर्ड केले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा महादेव कुंभार याने आत्महत्येपूर्वी मित्रांना पाठवलेला व्हिडिओ..