आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sugar Cane Rate Issue In Maharashtra, Farmer Harash

वाढीव ऊसदराबाबत तीन शेतकरी संघटनांच्या तीन तर्‍हा; वेगवेगळ्या दरांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- ऊसदरासाठी शेतकर्‍यांचे नेतृत्व करत असलेल्या तिन्ही संघटना दरवर्षी वेगवेगळ्या दरांची मागणी करतात आणि सरकारशी वाटाघाटी करून व्यवहार्य दरावर तडजोड केली जाते, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने अलीकडच्या काळात मुळातच व्यवहार्य ऊसदराची मागणी केल्याने त्यांच्या मागणीच्या जवळपास ऊसदर मिळाल्याचे दिसून येते.

ऊसदरासाठी पहिल्यांदा शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने 15 ते 20 वर्षांपूर्वी आंदोलन सुरू केले. त्यानंतर राजकीय कारणांनी खासदार राजू शेट्टी आणि नंतर रघुनाथ पाटील बाजूला झाले आणि त्यांनी स्वतंत्र संघटना उभारल्या. तेव्हापासून तिन्ही संघटनांची वेगवेगळ्या ऊसदराची मागणी राहिली आहे. रघुनाथ पाटील यांनी गेल्या वर्षीच्या हंगामात 4 हजार रुपयांची मागणी केली होती तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीन हजार रुपये मागणी केली होती. शरद जोशीप्रणीत संघटनेने मात्र 2600 रुपयांची मागणी केली होती आणि प्रत्यक्षात दर मिळाला 2500 रुपये.

शरद जोशी यांच्या संघटनेने 2010-11 आणि 2011-12 च्या हंगामात 2100 रुपये दराची मागणी केली होती. कारखानदारांनी 2010-11 मध्ये 2000 तर 2011-12 मध्ये 2050 रुपये दर दिला. यावर्षी रघुनाथ पाटील यांनी 3500 रुपये मागणी केली आहे. शरद जोशींच्या संघटनेने गेल्यावर्षीप्रमाणे 2500 रुपयांचीच मागणी केली आहे. स्वाभिमानी संघटनेने अद्याप दराची मागणी जाहीर केलेली नाही.

आमची मागणी रास्त : कोल्हे
शरद जोशीप्रणीत संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे म्हणाले, ‘आम्ही ऊसदराची मागणी करताना साखरेचे बाजारातील दर, उत्पादन, राज्य बँकेकडून मिळणारी उचल याची सांगड घालून व्यवहार्य मागणी करतो, त्यामुळे आम्ही मागणी केलेल्या दराच्या जवळपासच दर मिळतात.’
ऊसदर मागणीचे गणित

>125 किलो साखरेचे उत्पादन एक टन उसापासून होते.
> 3350 मिळणारे उत्पन्न (बाजारभावाप्रमाणे)
>450 रुपये उत्पादन खर्च
तोडणी-वाहतूक खर्च
>2350 रुपये निव्वळ उत्पन्न
(तोडणी-वाहतुकीचे रोख देणे वगळता वापरायला मिळणाºया भांडवलाचा विचार करता 2500 रुपये दर मिळणे अपेक्षित)

या वर्षीची शिल्लक साखर
2011-12 मधील 20 लाख टन
2012-13 च्या हंगामातील उत्पादन - 300 लाख टन

देशांतर्गत साखरेचा खप - 220 लाख टन
निर्यात - 50 लाख टन
सध्याची शिल्लक साखर- 50 लाख टन