आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sugar Mill Owners, Farmer Orgnisation Meeting Chief Minister

साखर कारखानदार, शेतकरी संघटना मुख्यमंत्र्यांना भेटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - उसदरासह साखर उद्योगाशी निगडित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांनी मुख्यमंत्र्यांची एकत्रित भेट घेण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्यामुळे साखर कारखानदार व शेतकरी संघटनांमध्ये या मुद्द्यावर तोडगा निघण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरप्रश्नी 15 नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी बुधवारी बैठक बोलावली होती. यात जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून आमदार सा.रे.पाटील. आमदार के.पी.पाटील आणि आमदार चंद्रदीप नरके यांनी भूमिका मांडली. तर खासदार राजू शेट्टी यांनी शेतक-यांची बाजू मांडली.
सरकारने कारखान्यांना अनुदान द्यावे : पाटील
आमदार सा.रे.पाटील म्हणाले, ‘ तिन्ही शेतकरी संघटनांनी वेगवेगळा दर मागितला आहे, त्यामुळे किती दर द्यावा, याबाबत गोंधळ आहे. कृषीमुल्य आयोगाने एफआरपीमध्ये वाढ केली असली तरी बँकांनी साखरेचे मुल्यांकन कमी केल्याने उतारानिहाय 1800 ते 2100 रुपये पहिली उचल देण्याचे गणित कारखानदारांनी मांडले आहे. साखरेचा दर सध्या 2680 रुपये आहे. त्यात आणखी घसरण झाल्यास कारखाने मोडीत निघतील. शासनाने कारखान्यांना अनुदान दिले नाही तर सहकारी साखर उद्योग मोडीत निघेल,’ असा इशारा त्यांनी दिला.
सांगलीत आज बैठक
स्वाभीमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारपासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर सांगलीचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी गुरुवारी तिन्ही शेतकरी संघटना आणि सांगली जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी कारखानदारांची बैठक बोलावली आहे. आंदोलनापूर्वी कारखानदारांनी दर जाहीर करून तोडगा काढावा, अशी प्रशासनाची भुमिका आहे. आम्हाला कारखानदार आणि संघटना दोन्हीही सारखेच आहेत; मात्र जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची आमची जबाबदारी आहे, असेही कुशवाह यांनी स्पष्ट केले.