आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sugar Scam CID Investigation Demand By Hasan Mushrif

साखर घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा; हसन मुश्रीफ यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- साखर कारखानदार आणि व्यापार्‍यांच्या संगनमतातून साखर विक्रीमध्ये 600 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा खासदार राजू शेट्टी यांच्या आरोपाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, तसेच त्यासाठी शेट्टींकडील पुराव्यांची माहिती घ्यावी, अशी मागणी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली.

साखर हंगामाच्या पार्श्वभूमिवर ऊस दर संघटनेची भूमिका, साखरेचे मूल्यांकन याविषयी मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट करताना शेट्टी यांचे आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली. साखर सम्राट किंवा कारखानदार नसल्याचे सांगत मुश्रीम ंयानी एक कार्यकर्ता म्हणून ऊसदराबाबत तोडगा निघण्यासाठी मध्यस्थीची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला. आंदोलनामुळे कुणाला त्रास होवू नये, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, ही यामागची भूमिका होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेट्टी यांच्या आरोपांमुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तो दुर करण्यासाठीच साखर विक्रीत झालेल्या 600 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाची सीआयडी किंवा शेट्टी सांगतील त्या यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची मदत घेत चौकशी करावी आणि निर्माण झालेला संभ्रम दुर करावा, असेही हसन मुश्रीफ म्हणाले.