आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहकारमंत्र्यांशी चर्चेनंतर राज्यातील ऊस कामगारांचे आंदोलन अखेर मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ऊस तोडणी कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये याबाबत ठोस कार्यवाही करण्यात येणार आहे. कामगारांच्या अन्य मागण्यांबाबत १६ फेब्रुवारीला साखर संघाच्या कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर ऊस तोडणी कामगारांनी सोमवारी आंदोलन मागे घेतले.

ऊस तोडणीची मजुरी प्रतिटन ३५० रूपये करावी, तीन लाखांचा अपघात विमा उतरावा, वाहतूकीचा दर १०० टक्के वाढवावा, मुकादमांचे कमिशन १८ टक्के आहे ते २२ टक्के करावे यासह अन्य मागण्यांसाठी व नवीन करार करण्यासाठी ऊस तोडणी कामगारांनी रविवारपासून कोयता बंद आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे काही कारखान्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता होती. हा प्रश्न चिघळला तर आधीच अडचणीत असलेल्या साखर उद्योगासमोरील अडचणींमध्ये भर पडणार होती. त्यामुळे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. स्वतंत्र महामंडळाची कार्यवाही करणे व अन्य मागण्यांबाबत राज्य साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, ऊस तोडणी कामगारांच्या नेत्या व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह १६ फेब्रुवारीला बैठक घेण्याचे ठोस आश्वासन पाटील यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.