आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुहास खामकरच्या घराची झडती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - प्रख्यात शरीरसौष्ठवपटू आणि पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकर याला सोमवारी 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. दरम्यान, त्याच्या कोल्हापुरातील घराचीही झडती घेतली जात आहे. खामकर याला अटक केल्यानंतर त्याचे मूळ गाव म्हणून कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांना अधिक तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार या विभागाच्या एका पथकाने दौलतनगर परिसरातील खामकर याच्या छोट्या मूळ घराची झडती घेतली असता काही आक्षेपार्ह सापडले नसल्याचे समजते.