आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील खुनाच्या गुन्ह्यात गेली 4 वर्षे शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने आज सकाळी नैराश्येतून शौचालयात जाऊन स्वत:वर वार करून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तात्काळ येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गणेश पोपट शिंदे (वय 30) असे या कैद्याचे नाव आहे. यापूर्वीही 2015 मध्येदेखील त्याने असा प्रयत्न केला होता. तो मुळचा सोलापूर जिल्ह्यातील कुरुडवाडी गावचा आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी गणेश पोपट शिंदे याने ब्लेडने हातावर, पोटावर, मांडीवर 10 ते 12 वार करून घेतले. कैद्यांना दाढी करण्यासाठी ब्लेड दिले जातात. याच ब्लेडचा वापर करून कारागृहातील पाचव्या क्रमांकाच्या सर्कल मधील शौचालयात जाऊन या कैद्याने हा प्रकार केला.
कारागृहाच्या प्रशासनाला माहिती मिळताच तात्काळ या कैद्याला छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कळंबा कारागृह अधिक्षक शरद शेळके म्हणाले की, या कैद्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंद केला जाईल.
बातम्या आणखी आहेत...