आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभेत सुप्रिया सुळेंना भोवळ, व्यासपीठावरून कोसळल्या, बघा PHOTOS & VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - तासगाव विधानसभा पोटनिवडणुकीची प्रचारसभा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे चक्कर येऊन कोसळल्या. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. सुदैवाने यात सुळे यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ११ एप्रिल रोजी आहे. या निवडणुकीत आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमनताई राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांच्या मंगळवारी तीन सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी पहिली सभा तासगाव येथेच होती. त्यासाठी सकाळी सुळे या कारने पुण्याहून निघाल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास त्या तासगाव येथे आयोजित महिला मेळाव्यात भाषणासाठी उभा राहिल्या. थोडावेळ भाषण झाल्यानंतर अचानक चक्कर येऊन त्या व्यासपीठावरच कोसळल्या.

त्यामुळे एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना आधार देत सभागृहातील एका खोलीत नेले. तेथे उपस्थित असलेल्या डॉ. माळी यांनी त्यांची तातडीने प्राथमिक तपासणी केली. बराचवेळ उपाशी राहिल्याने आणि दुपारच्या उन्हात सभागृहात असलेल्या गर्दीमुळे त्यांना भोवळ आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोसळल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तासगाव येथेच जेवण करून त्या पुढे शिरढोण आणि कवठे महांकाळ येथील सभेसाठी रवाना झाल्या.
पुढील स्लाईडवर बघा, स्टेजवर कशा पडल्या सुप्रिया सुळे... त्यानंतर कार्यकर्त्यांनी दिले पाणी...बघा व्हिडिओ...