आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांगलीत सापडले दोन जिवंत बॉम्ब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथे बुधवारी बेवारस स्थितीत दोन जिवंत हातबॉम्ब सापडले आहेत. सकाळी राजोबाचीवाडी येथील केराप्पा जयवंत ढेंबरे हा सातवीत शिकत विद्यार्थी गोंधळेवाडीला शाळेत निघाला होता. त्याला गोंधळेवाडीजवळ रस्त्याकडेला दोन बॉम्ब दिसले. दिवाळीत फटाके असावेत असे समजून तो ते शाळेत घेऊन आला. मुख्याध्यापकांना कुणकुण लागताच त्यांनी ते बॉम्ब ताब्यात घेतले व शंका आल्याने पोलिसांना माहिती दिली. त्यांनाही हे हातबॉम्ब असावेत, असा संशय आला. त्यांनी तातडीने सांगलीतील पोलिस मुख्यालयात याची माहिती दिली.
या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेवून अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधात बॉम्बशोधक पथकासह गोंधळेवाडीला रवाना झाले. बॉम्बशोधक पथकाने तपासणी केल्यानंतर हे जीवंत हातबॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले. या पथकाने दोन्ही बॉम्ब ताब्यात घेतले असून त्याची तपासणी करून उद्या त्याबाबतचा अहवाल मिळेल, असे डॉ. प्रधान यांनी सांगितले.