आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Suspected MNS, Shiv Sena Activists Attack North Indians In Kolhapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालिका मृत्यूच्या अफवेने कोल्हापुरात तणाव; परप्रांतीयांना मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - झारखंडच्या युवकाकडून लैंगिक अत्याचार झालेल्या मुलीचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने मंगळवारी सकाळपासून कोल्हापूर शहर अघोषित बंद होते. रिक्षा व शहर बस वाहतूक सुरू असली तरी महाद्वार रोडपासून मुख्य रस्त्यांवरील अनेक दुकाने बंद होती.

राजूसिंग बबलीसिंग या सेंट्रींगचे काम करणार्‍या कामगाराने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील वॉचमनच्या सव्वा दोन वर्षांच्या मुलीवर सोमवारी लैंगिक अत्याचार केले होते. यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला बेदम चोप देऊन लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात नेले होते. यानंतर संध्याकाळपासून रात्रीपर्यंत शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी परप्रांतीयांच्या गाड्या उधळून लावल्या तर दुकाने बंद करण्यास भाग पाडले. अनेक ठिकाणचे साहित्यही विस्कटले.

मंगळवारी सकाळी फुलेवाडी रस्त्यावर नागरिकांनी रास्ता रोको केला, सिटीबसवर दगडफेकही करण्यात आली. या वेळी पोलिस आणि आंदोलकांत बाचाबाची झाली. नंतर पोलिसांनी लाठीमार केला. याच वेळी लक्षतीर्थ वसाहतीतील महिलांनीही आंदोलनास सुरुवात केली. याचवेळी अत्याचारीत मुलीचा सीपीआर इस्पितळात मृत्यू झाल्याची अफवा पसरली. यामुळे शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. काही वेळातच कार्यकर्ते शहरात फिरू लागल्याने दुकानेही बंद झाली. काही शाळांही सोडण्यात आल्या. मनसे कार्यकर्त्यांनी गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील अक्षय मेटल्स कारखान्यातील 20 ते 25 परप्रांतीय कामगारांना चोप दिला. दरम्यान, मुलीची प्रकृती चांगली असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

आरोपीला 19 पर्यंत पोलिस कोठडी
झारखंडचा नराधम बबलीसिंग याला जमावाने सोमवारी बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मंगळवारी न्यायालयाने त्याला 19 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.