Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | teacher husband and wife burn

अभियंते हे राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार

प्रतिनिधी | Update - Mar 03, 2012, 12:41 AM IST

कोणत्याही देशाचा विकास हा तेथील संशोधनावर अवलंबून असतो. एका संशोधनातून दुसरे संशोधन जन्म घेत असते.

  • teacher husband and wife burn

    सोलापूर - कोणत्याही देशाचा विकास हा तेथील संशोधनावर अवलंबून असतो. एका संशोधनातून दुसरे संशोधन जन्म घेत असते. त्यामुळेच संशोधनातून विकास साधणारे अभियंते राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार ठरतात, असे गौरवोद्गार माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी शुक्रवारी काढले.
    आर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानपर कार्यक्रमात ते बोलत होते. ‘भारताला प्रगत राष्ट्र बनविण्यात अभियंतांचे योगदान’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ . अनिल काकोडकर, पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, प्राचार्य डॉ. दपेदार, प्रा. सी. बी. नाडगौडा आदी उपस्थित होते.
    व्यवस्थेवर भाष्य करताना डॉ कलाम म्हणाले, की व्यवस्थेमध्ये एकात्मता, विकास, आराखडा हा महत्त् वाचा असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एकमेकांना पूरक आहेत. त्यांची योग्य सांगड घातल्यास देशाच्या विकासाची गती नक्कीच वाढेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.Trending