आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो पाठवायचा अश्लील संदेश; मुलीच्या नातेवाईकांनी त्याला शिकवला असा धडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- एका नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणाऱ्याला मुलीच्या नातलगांनी चांगलाच धडा शिकवला. विद्यार्थिनी इयत्ता आठवीत शिकत आहे. शिक्षक शीतलकुमार माने (वय ३३, रा. उजळाईवाडी) हा तिला अश्लील संदेश पाठवत होता. त्याची पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शाळेत जाऊन चांगलीच धुलाई केली.
 
भेटण्यासाठी होता बोलवत
माने याच्या विरोधात मुलीच्या आईने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल दिली आहे. माने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी 8 वीच्या वर्गात शिकत असून गेल्या आठ दिवसापासुन शिक्षक शीतल माने हा तिला रात्रीच्या वेळी मोबाईलवर अश्लील संदेश पाठवून त्रास देत होता. तिला भेटण्यासाठी अंबाबाई मंदिर, शाळेच्या चौथ्या मजल्यावर बोलवत होता. यामुळे ती चार दिवसापासून घरात शांत राहत होती. गुरुवारी रात्री तिच्या मामाने तिच्याकडे याबाबत चौकशी केली. तेव्हा तिने घडलेली संपूर्ण हकीकत कुटुंबियांना सांगितली.
 
शाळेतच करण्यात आली मारहाण
माने याला जाब विचारण्यासाठी शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान मुलीचे आई, वडील, मामा, व इतर नातेवाईक हे शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे गेले. शहानिशा करण्यासाठी मुख्याध्यापिका यांनी माने याला बोलावून घेतले. तेव्हा माने याने उडवाउडवीची उत्तरे देणास सुरुवात केली. नातेवाईकांनी मोबाईलवरील संदेश मुख्याध्यापिका यांना दाखवले. आठ–दहा नातेवाईकांनी माने याला मुख्याध्यापिकेच्या कार्यालयातच मारहाण केली.
 
माने रुग्णालयात दाखल
माने याला डोक्याला व हाताला गंभीर मार लागला आहे. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माने विवाहित असून त्याला दोन मुले  आहेत. गेली पाच वर्षापासून या शाळेत शिक्षक म्हणून तो काम करत आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्मिता काळभोर या करत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...