आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरच्या गांधी मैदानात फाटक्या नोटांचा ढीग !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - शहरातील शिवाजी पेठेनजीकच्या गांधी मैदान परिसरात शुक्रवारी फाटक्या नोटांचा ढीग सापडला. अपना बँकेच्या पाठीमागील बाजूस या नोटा आढळल्याने चर्चेला उधाण आले होते. न चालणा-या नोटा अज्ञात लोकांनी टाकल्या असाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे.


शुक्रवारी दुपारी काही युवकांना या फाटक्या, भिजलेल्या नोटांचा ढीग आढळून आला. त्यांनी ही माहिती आपल्या मित्रांना सांगितली. त्यामुळे तेथे गर्दी झाली. अनेकांनी छोट्या काठीने नोटा उलट्यापालट्या करत त्यातील चालणा-या नोटा खिशात घातल्या. यात अगदी मोजक्या अशा हजार, पाचशेच्या नोटा होत्या, त्या काहींनी लंपास केल्या; परंतु उरलेल्या 1 ते 50, 100 रुपयांपर्यंतच्या नोटा तशाच पडून होत्या. याबाबत माहिती मिळाल्यानंतर जुना राजवाडा पोलिस त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या सर्व नोटा पोलिस ठाण्यात आणल्या. यातील बहुतांश नोटा या फाटक्या, गुलाल लागलेल्या आणि लगदा झालेल्या होत्या. बँकेच्या पाठीमागील बाजूस या नोटा आढळल्याने त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे.


न चालणा-या नोटा
या सर्व नोटा अतिशय खराब झालेल्या असून बँकेतही बदलून मिळणार नाहीत. त्यामुळे हे 3900 रूपये संबंधिताने टाकल्या असाव्यात, असा संशय असल्याचे उपविभागीय पोलिस अधीक्षक व्ही. टी. पवार यांनी सांगितले. या नोटा भिका-यांनीही टाकल्या असाव्यात असा संशय आहे.