आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेम्पो- टँकर अपघात; राजस्थानच्या भाविकांवर कराडजवळ काळाचा घाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - शिर्डीकडे निघालेल्या भाविकांच्या टेम्पोला दुधाच्या टँकरने पाठीमागून धडक दिल्याने पाच ठार, तर दहा जण जखमी झाल्याची घटना पुणे- बंगळुरू महामार्गावरील कराडजवळील बेलवडे येथे शनिवारी पहाटे साडेचार वाजता घडली. मृत हे राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जखमींना सह्याद्री व कॉटेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शंकरलाल उगाराम चौधरी (५५), सीता शंकरलाल चौधरी (५०),दीपिका प्रकाशचंद चौधरी (५०), मायादेवी प्रकाश शर्मा (३०), संपतीबाई अमरचंद जहांगीड (५० सर्व रा. ता. जैतारण, जि. पाली, राजस्थान) अशी मृतांची नावे आहे.

राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील शर्मा, चौधरी व उपाध्ये कुटुंबातील १८ जण शिर्डी, नारायणपूर येथे देवदर्शनासाठी इचलकरंजी येथील ओझा कुटुंबीयांकडे आले होते. शनिवारी टेंपोने ही मंडळी शिर्डीकडे निघाली हेाती. पहाटे साडेचारच्या सुमारास चालकाने बेलवडे हवेली येथील बस थांब्याजवळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली होती.

या वेळी कोल्हापूरहून भरधाव येणा-या दुधाच्या टँकरने टेंपोला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की टेंपोचा चक्काचूर झाला, तर दुधाच्या टँकरने दोन-तीन कोलांटउड्या घेतल्या. यात पाच जागीच ठार, तर दहा जण जखमी झाले. अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.