आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tenth Years Goddess Malaxmi Temple Free Of Cost Cleaness

महालक्ष्मी मंदिराची दहा वर्षांपासून मोफत स्वच्छता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - मूळचे गुहागर येथील आणि मुंबईत स्थायिक प्रख्यात उद्योजक संजय खानविलकर दहा वर्षांपूर्वी तिरुपतीला गेले होते. तेथून परतताना त्यांनी कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घेतले. पण दोन्ही ठिकाणच्या स्वच्छतेतील फरक त्यांना जाणवला. त्यामुळे त्यांनी मंदिराची मोफत स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या 10 वर्षांपासून संजय मेंटेनन्सच्या माध्यमातून ते नवरात्रीआधी मंदिर आणि परिसराची स्वच्छता करून देत आहेत.


खानविलकर यांनी देवस्थान समितीला प्रस्ताव दिला. त्यांनी ही सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला. गेली 10 वर्षे ते महालक्ष्मीच्या चरणी सेवा रुजू करत आहेत. नवरात्रीच्या आधी 10 दिवस त्यांच्या कर्मचा-यांची 20 जणांची टीम संजय माने यांच्या नेतृत्वाखाली हे काम करते. गाभा-यापासून ते मंदिर परिसराची संपूर्ण स्वच्छता केली जाते.
इमारती किंवा मंदिरे स्वच्छ करताना नेहमीच्या पद्धतीने काम करता येत नाही. त्यासाठी यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता केल्यास त्याचा परिणाम दिसून येतो. मंदिराच्या ठिकाणी तेल, तूप, हळद, कुंकू, नारळाच्या पाण्याचे डाग याच्या स्वच्छतेसाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतात. खानविलकर यांची कंपनी गेल्या 42 वर्षांपासून मोठमोठ्या
इमारती, कारखाने स्वच्छ करण्याचे काम करते. मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये त्यांचे ग्राहक आहेत.


समाधानच महत्त्वाचे
देशभरातील अनेक मोठमोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी आमची कंपनी अनेक वर्षे काम करत आहे. मात्र, या ठिकाणची बाब निराळी आहे. ही सेवा करताना मिळणारे समाधान हे शब्दांमध्ये व्यक्त करता येण्यासारखे नाही.
संजय खानविलकर, सर्वेसर्वा, संजय मेंटेनन्सचे.