आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडपीठासाठी वकिलांचे कोल्हापुरात आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला मंजूर करण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ स्वातंत्र्यदिनी जिल्हा न्यायालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात अाला. वकील आणि पक्षकारांनी केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

गेल्या २५ वर्षांपासून काेल्हापुरात खंडपीठासाठी आंदोलन सुरू अाहे. या आंदोलनामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांचा पाठिंबा असताना कोल्हापूरला खंडपीठ होत नसल्याने संतप्त झालेल्या वकील आणि पक्षकारांनी १५ आॅगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठा पोलिस फाटा न्यायालयासमोर तैनात करण्यात आला होता. अनेकांच्या गाड्या तपासून झेंडावंदनासाठी आत सोडले जात होते. मात्र, झेंडावंदन झाल्यानंतर रस्त्यावर येत वकिलांनी बाटलीतून आणलेले राॅकेल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी अखेर सर्व वकिलांना ताब्यात घेऊन त्यांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आणले हाेते.