कोल्हापूर- कोणी कुत्रा पाळून तर कोणी सुरक्षारक्षक नेमून आपल्या घराची सुरक्षा करतो. मात्र, कसबा बावड्यातील मराठा कॉलनीत राहणारे पाटील कुटुंबीयांचा रखवालदार एक अनोखा तुर्रेवाला कोंबडा असू शकेल, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र हे अगदी खरे आहे.
पाटील कुटुंबातील व्यक्तींना कुक्कुटपालनाचा छंद आहे. त्यातून त्यांनी चार महिन्यांपूर्वी कोंबडीचे पिलं खरेदी केली. यात चार कोंबड्या आणि दोन कोंबडे होते. ही पिलं आता चांगलीच मोठी झाली आहेत. पाटील कुटुंबाच्या राहत्या घराच्या आजूबाजूला दररोज सकाळी 7 वाजल्यापासून हा कोंबडा इतर कोंबड्यांसोबत एखादया रखवालदाराप्रमाणे फिरतो. आता मात्र हा कोंबडा परिसरात येणाऱ्या महिला आणि मुलांमध्ये भीतीचे कारण बनला आहे.
दोन कोंबडे आणि तीन कोंबड्यांपैकी एक भलताच वाढ झालेला तुर्रेवाल्या कोंबड्याची गंमत अशी की, तो कोणालाच पाटील यांच्या घराच्या आजूबाजूला फिरकू देत नाही. कुटुंबातील सदस्यांना काहीही इजा न करणारा हा कोंबडा अनोळखी व्यक्तीतिवर क्षणात अटॅक करतो. लहान मुलगा असो वा एखाद्या महिलेहीला तो घराच्या आजूबाजूला फिरकू देत नाही. घराच्या गेटसमोर त्याला कोणी अनोळखी व्यक्ती आलेली दिसली तर तो चपळाईने धावत जाऊन अक्षरशः त्याच्यावर अटॅक करून त्याला जखमी करतो.
या कोंबड्यामुळे मराठा कॉलनीत चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. काहीजण आपल्या घराच्या प्रवेश द्वारावर कुत्र्यापासून सावध राहा, असे लिहितात. मात्र पाटील कुटुंबाला आता आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर कोंबड्यापासून सावध राहा, असे लिहिण्याची वेळ आली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... पाटील कुटुंबीयांचा रखवालदार तुर्रेवाल्या कोंबड्याचा व्हिडिओ आणि फोटो..... (व्हिडिओ शेवटच्या स्लाइडवर...)