आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थीनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकास तेरा वर्षांची सक्तमजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करून त्याची अश्लील क्लिप करून ती प्रसारित करणाऱ्या इम्रान मौला कलावंत (३४, रा. गावभाग इचलकरंजी) याला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश आसमर यांनी १३ वर्षे सक्तमजुरी ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी न्यायालयात मोठी गर्दी केली होती.

२ जुलै २००८ रोजी प्रश्नपत्रिका आणि नोटस् देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर इम्रान याने बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने धमकी देत काही वेळा बलात्कार करून त्याची क्लिप बनवून ती सर्वत्र प्रसारित केली होती. यानंतर इम्रान याला काळे फासून, मारहाण करून त्याची गाढवावरून धिंड काढली होती. याप्रकरणी ३१ साक्षीदार तपासण्यात आले होते.
गुरू आणि शिष्य या नात्याला काळिमा फासणारे कृत्य आरोपीने केल्याने त्याला कडक शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली.