आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गृहराज्यमंत्री पाटील यांच्या कार्यकर्त्यासह तिघांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- शहरात झालेल्या अशोक पाटील खूनप्रकरणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गटाचा कार्यकर्ता दिलीप जाधव याच्यासह तिघांना कोल्हापूर पोलिसांनी शनिवारी अटक केली. पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी ही माहिती दिली. दिलीप अशोक जाधव (रा. माळवाडी) त्याचा भाऊ अमोल, हरीश बाबूराव पाटील (रा. टिटवे, ता. राधानगरी) आणि ओंकार विद्याधर सूर्यवंशी (23 रा. निपाणी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी त्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.


13 फेबु्वारीला महाडिक यांचे कट्टर समर्थक व अशोक पाटील यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. अशोक यांच्यावरही 11 गुन्हे दाखल होते. यानंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नावासह फिर्याद घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याने महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी सीपीआर आवारात गोंधळ घातला होता.

सतेज पाटील यांची नार्को टेस्ट करा : धनंजय महाडिक
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या तीन वर्षांच्या कालावधीत दक्षिण करवीर विधानसभा मतदारसंघात विरोधकांना जिवानिशी संपवण्याचे उद्योग सुरू झाले असून त्यांना मंत्रिमंडळातून काढून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी महादेवराव महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक यांनी केली. पाचगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील यांच्या खूनप्रकरणी दिलेल्या फिर्यादीमध्ये महाडिक काका-पुतण्यांनी दबावाने आपले नाव गोवले असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला होता.