आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा तालुक्यात तीन भावांचा बुडून मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- आसगाव (ता. सातारा) येथे दहा ते बारा वयोगटातील तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. मृतांत दोन सख्खे भाऊ व एका चुलत भावाचा समावेश आहे.
आसगाव येथील प्राथमिक शाळेत चौथीत शिकणारे अमोल भीमराव कांबळे आणि धीरज राहुल कांबळे (10) हे शाळेच्या मधल्या सुटीनंतर गावातील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांच्यासोबत असलेला धीरज कांबळे याने या दोघांनाही बाहेर काढण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र त्यालाही वर येता आले नाही. या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. दरम्यान, अभिषेक कांबळे याने ही घटना पाहिली आणि तातडीने शाळेत जाऊन शिक्षकांना माहिती दिली. गावातील तरुणांनीही तातडीने तलावात उडी घेऊन या तिघांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिघांचीही प्राणज्योत मालवली होती.