आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तवंदी घाटात कारचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात वकीलासह दोन पक्षकार ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारचा टायर फुटल्याने हा अपघात घडला. - Divya Marathi
कारचा टायर फुटल्याने हा अपघात घडला.
कोल्हापूर- भरधाव वेगाने कोल्हापूरकडे येणाऱ्या कारचा ( MH -09-9688) स्तवनिधी (टवंडी) घाटात हिटणी गावाजवळ टायर फुटल्याने झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्याकडेला असणाऱ्या विद्युत खांबावर ही कार आदळली. मृतांमध्ये वकीलासह दोन पक्षकार आहेत. हे तिघेही आजरा न्यायालयात कामासाठी गेले होते. हा अपघात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.
 
मृतांमध्ये येथील माजी सरकारी वकील जाहिदअली उर्फ जावेद मुल्ला ( वय 47 रा.विक्रम नगर,कोल्हापूर ), पक्षकार चंद्रकांत पाटील आणि पंडित सुतार ( दोघेही रा.पडळ,ता.पन्हाळा)
या तिघांचा समावेश आहे. अपघातात  वकील आणि पक्षकार ठार झाल्याने कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनमध्ये  शोककळा पसरली आहे. अपघात स्थळावरील दृष्य विदारक होते. या अपघाताची नोंद संकेश्वर पोलिस ठाण्यात झाली आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...