आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Students Died, Chargesheet Filed 20 Contractors

तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; २० ठेकेदारांवर गुन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - वाळू व्यावसायिकांनी खोदलेल्या खड्ड्यात पडून तीन शाळकरी मुलांचा अंबवडे येथे मृत्यू झाला होता. या प्रकारास जबाबदार तहसीलदार व प्रांतांना तातडीने निलंबित करा, या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी वडूज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणी पोलिसांनी २० वाळू ठेकेदारांवर गुन्हा दाखल
केला आहे. येरळा नदीपात्रातील वाळू व्यावसायिकांनी खणलेल्या खड्ड्यात पडून अंबवडे (ता. खटाव) येथील स्मिता पवार, स्वप्निल पवार व पूजा पवार यांचा मृत्यू झाला होता. याविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून प्रशासनासह ठेकेदारांवर कारवाईची मागणी होत आहे.