आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईहून सातार्‍यात पर्यटनासाठी आलेले तिघे मुले बुडाले; एकाचा मृत्यू, दोघे अत्यवस्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- मुंबईहून सातारा जिल्ह्यातील मेणवली येथे पर्यटनासाठी आलेले तीन तरुण बुडाल्याची माहिती मिळाली आहे. तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दोघे अत्यवस्थ असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून आपल्या नातेवाईकांसोबत तिघे तरुण आले होते. त्यांचे नातेवाईक हे पाचगणीत थांबले होते. मेणवली येथे सिनेमांचे शुटींग सुरु असते. त्यामुळे तिघे हे ठिकाण पाहण्यासाठी आले होते. परिसरात असणाऱ्या नदीपात्रात हे तिघेही पोहण्यासाठी उतरले. एक जण बुडत असल्याचे पाहून दोघे त्याला वाचवण्यासाठी गेले असता तिघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि ट्रेकर्स नदीवर पोहोचले. त्यांनी तिघांना बाण्यातून बाहेर काढले. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी एकाला मृत घोषित केले आहे. दोघांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पोलिस पुढील तपास करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...