आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिशीच्या आतच गर्भाशयाची पिशवी काढणारे रॅकेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कर्करोगाच्या भीतीपोटी वा अन्य कारणांमुळे गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्याचे गंभीर प्रकार बीड, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यांत झाले आहेत. कर्करोग प्रतिबंधक (सर्व्हायकल कॅन्सर) संदर्भात बार्शीच्या नर्गिस दत्त मेमोरियल कर्करोग रुग्णालयाकडून ग्रामीण भागात २००६ पासून जनजागृतीचे काम केले जाते. त्या पाहणीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या मार्गदर्शनाखाली बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यांतील ग्रामीण भागात शिबिरांचे आयोजन केले जाते. अशा शिबिरांतून आतापर्यंत सुमारे दीड लाखाहून अधिक महिलांची तपासणी करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे संशोधन समन्वयक एन. एस. पानसे यांनी दिली. शिबिरामध्ये येणाऱ्या दर शंभर महिलांपैकी किमान आठ ते दहा महिलांच्या गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्याचे आढळले. विशेष म्हणजे वयाच्या ३०, ३५ वर्षांच्या अगोदरच पिशवी काढण्याचे प्रमाण वाढत आहे. या तिन्ही जिल्ह्यांपैकी बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्याखालोखाल उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांत गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. कर्करोगाच्या भीतीपोटीच बहुतांश प्रकरणांत गर्भपिशवी काढून टाकण्यात आल्याचे पानसे यांनी सांगितले.
हा कर्करोगावर उपाय नाही
गर्भाशयाची पिशवी काढणे कितपत योग्य आहे? याचा विचार न करता काढून टाकली जाते. कर्करोगाच्या भीतीपोटी तपासणी व उपाय करण्याअगोदरच पिशवी काढणे हा कर्करोगावरचा उपाय नाही. शिवाय, पिशवी काढल्यानंतरही महिला तक्रारी घेऊन शिबिरांमध्ये येतात. पिशवी काढण्यासाठी महिला तयार का होतात ? या मागे जनजागृती कमी झाली, आमच्याकडून प्रशिक्षण कमी पडले हा मुख्य मुद्दा आहे. त्याचबरोबर यात समाजाचीही चूक आहेच.
डॉ. बी. एम. नेने, (अध्यक्ष, कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी)
बातम्या आणखी आहेत...