आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात 15 पैकी 9 जागांवर काँग्रेस बाजी; शिवसेनेला 3 तर भाजपला केवळ 2 जागा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- जिल्ह्यातील जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालमध्ये करवीर तालुक्यामध्ये सरपंचपदाच्या 15 निकालापैकी 9 जागांवर कॉंग्रेसने बाजी मारली आहे. तर शिवसेनेला 3 जागांवर तर भारतीय जनता पक्षाला केवळ 2 जागा मिळाल्या आहेत.तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदरात 1 जागा पडली आहे.

शेळकेवाडीतून काँग्रेस चे सरपंच पदाचे उमेदवार रंगराव बाबूराव शेळके यांनी ३ मतांनी विजय मिळवला आहे. भाटणवाडी अमर आनंदा कांबळे, पासार्डे वंदना अशोक चौगले, हणबरवाडीतून सुप्रिया बाजीराव वाडकर या काँग्रेसच्या उमेदवारांनी  बाजी मारली आहे, तर सडोली दुमालातून  मनोहर कांबळे, सोनाळीतून मोहन बळवंत पाटील, आणि कांडगाव मधून रुपाली बाळासो मेडसिंगे, म्हाळुंगेच्या पार्वती ईश्वरा चौगुले, कंदलगावमध्ये अर्चना साहिल पाटील यांनी बाजी मारली आहे.

भाजपने कावणेतून सुनील टिपुगडे आणि सादळे-मादळेतून मिनाक्षी विजय जाधव यांनी विजय मिळविला. शिवसेनेच्या उमा संभाजी पचिंद्रे यांनी प्रयाग-चिखलीतून, सावर्डे दुमालातून सुवर्णा कुंडलिक कारंडे तर नंदवाळमधून अस्मिता युवराज कांबळे यांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादीला परितेतून अक्काताई सुदाम कारंडे ही जागा मिळाली आहे. आरळेतून सर्वपक्षीय आघाडीचे ईश्वरा शामराव कांबळे यांनी बाजी मारली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...