आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toll Agiation, People Response To Kolhapur \'bandh\'

\'कोल्हापूर बंद\'ला प्रतिसाद, IRBचा मुजोरपणा सुरुच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापूरात आयआरबी कंपनीने पुन्हा एकदा टोल वसुलीला सुरुवात केल्याने कोल्हापूर टोलविरोधी कृती समितीने आज 'कोल्हापूर बंद'ची हाक दिली आहे. या बंदला कोल्हापूरकरांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. याचबरोबर यापुढील काळातही टोलविरोधी मोहिम टप्पाटप्प्याने तीव्र करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.
आयआरबी या कंपनीने कडक पोलिस बंदोबस्तात बुधवार सकाळपासून टोल वसुलीला सुरुवात केली आहे. त्याचा निषेध कोल्हापूरकरांसह सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी केला आहे. यासाठी कोल्हापूर महापालिकेतील सर्वपक्षीय 82 नगरसेवकांनी राजीनामे महापौरांकडे सुपूर्त केले आहेत. मात्र, याकडे सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, कोल्हापूर जनतेने जिल्ह्यातील दोन मंत्री सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांना राज्य सरकारमधून राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. राज्य सरकार व मुख्यमंत्री आमच्या मंत्र्यांचे म्हणणेही ऐकत नाहीत. पाटील व मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा व कोल्हापूरात यावे आम्ही त्यांचे जंगी स्वागत करू असे कोल्हापूरकरांनी म्हटले आहे.
दरम्यान, सरकारी पातळीवरूनही याबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आयआरबी कंपनी याला दाद देत नाहीये. त्यामुळे सरकारची गोची झाली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आयआरबीने केलेल्या रस्त्याच्या कामाचे फेरमूल्यांकन करण्यास तयार आहेत. मात्र कंपनीने त्याआधी पैसे देण्याबाबत कोर्टात लेखी हमी द्यावी अशी मागणी केली आहे. तरच आम्ही सुरु केलेला टोल वसुली थांबवू असे सांगितले आहे. मात्र, ही लेखी हमी व पैसे कोण देणार यावरून खल सुरु आहे. राज्य सरकार कोर्टात लेखी हमी द्यायला तयार नाही. दरम्यान, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी राज्य सरकार टोल रस्त्यांचे मूल्यांकन येत्या महिन्याभरात करावे. पैसे कसे द्यायचे ते आम्ही सांगू, अशी भूमिका घेतली आहे.
सरकार आज, उद्या आयआरबीशी वाटाघाटी करणार, वाचा पुढे...
सरकारने टोल वसूली बंद करावी, की तशीच सुरू ठेवावी... सर्वसामान्य जनता पायाभूत सुविधांसाठी करांच्या रुपाने सरकारला मदत करीत असतानाही टोल वसूली योग्य आहे का... आपल्याला काय वाटते.... आपली मते प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त करा... आमच्या फेसबुक पेजलाही भेट द्या...