आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत संपलेलेच टोलनाके बंद करून फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- राज्य सरकारने बंद केलेल्या 44 टोलनाक्यांपैकी सांगली जिल्ह्यातील दोन्ही टोलनाक्यांची यापूर्वीच मुदत संपलेली आहे. त्यामुळे हे नाके बंद करण्याची घोषणा करून शासनाने फसवणूक केल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत 44 टोलनाके बंद करत असल्याचे जाहीर केले. मात्र, सरकारने जाहीर केलेल्या यादीतील सांगली जिल्ह्यातील दोन्ही टोलनाक्यांची मुदत यापूर्वीच संपली आहे. मिरज- म्हैसाळ रस्त्यावरील टोलनाक्याची मुदत 2010 मध्ये संपली होती. मात्र, ठेकेदाराने शासनाकडे मुदतवाढ मागितली. त्याप्रमाणे शासनाने जून 2012 पर्यंत ठेकेदाराला मुदतवाढ दिली होती. वाढीव मुदत संपल्यानंतर ठेकेदाराने वसुली करण्याचा केलेला प्रयत्न काही संघटना, राजकीय पक्षांनी हाणून पाडला. त्यामुळे या नाक्यावर जून 2012 पासून वसुली बंदच आहे.

सांगली-इस्लामपूर मार्गावरील टोलनाक्याची मुदतही 2013 मध्ये संपली आहे. तथापि ठेकेदाराने अद्यापही सात कोटी रुपये येणे बाकी असल्याचे सांगत वसुली सुरू ठेवली होती. मात्र, जानेवारी महिन्यात सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने आंदोलन केल्यानंतर टोलवसुली बंद ठेवण्यात आली. शासनानेही वसुली बंद ठेवण्याचे आदेश ठेकेदाराला दिले होते. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून या नाक्यावरील टोलवसुलीही बंदच आहे. सरकारने टोलची उर्वरित रक्कम म्हणून 34 कोटी रुपये ठेकेदारांना देण्याचा निर्णय घेतला. मात्र, टोलवसुलीची मुदत संपलेल्या कामांचे देणे लागतेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.