आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tow Brothers Drowned Whil Ganesh Visarjan In Sangali

श्री विसर्जनावेळी बुडून सांगलीत दोन भावांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोघा चुलत भावांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सांगलीत घडली. शहरातील वसंतदादा औद्योगिक वसाहतीत रंग कारखान्यात काम करणारे दादुनाथ सुरेश जाधव (३२), आणि भैरवनाथ शिवाजी जाधव (३५) यांना आपल्या नातेवाइकांचे निधन झाल्याची बातमी सोमवारी कळली. त्यामुळे तत्काळ गणपती विसर्जन करण्यासाठी म्हणून कारखान्यात सुटी घेऊन घरी आले.
भाड्याने रिक्षा करून दोघेही आपल्या मुलांना घेऊन सकाळी अकराच्या सुमारास कृष्णा नदीकाठी आले. विसर्जनासाठी गर्दी असल्याने ते थोडे दूर गेले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. तरीही एक जण नदीपात्रात उतरला. नदीचा काठ खोल असल्याने तो बुडाला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा पाण्यात उतरला. मात्र त्यालाही पोहायला येत नसल्याने दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि दोघेही बुडाले. मुलांचा आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले; मात्र तोपर्यंत दोघेही बुडाले होते. दुपारी एकच्या सुमारास जीवरक्षकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले.