आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर - कोल्हापूर महापालिका परिवहन सेवेच्या बसला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली होती.मात्र
बसचा चालक एच एच सय्यद यांच्या दक्षतेमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले.
कसबा बावड्याकडे निघालेल्या बसला शॉर्टसर्किटमुळे इंजिनला आग लागले.बाहेर आलेल्या धूराकडे चालक सय्यद यांचे लक्ष गेले व त्यांनी लगेच सीपीआर दवाखान्यासमोर बस थांबवली.चालक सय्यद व कंडाक्टर यांनी सर्व प्रवाशांना उतरवून दुस-या बसमध्ये बसवले .आग अधिक भडकण्यापूर्वीच अग्निशामन दलाचे बंब घटनास्थळी आले होते. पण तोपर्यंत आग आटोक्यात आले होते. चालक सय्यद यांच्या सतर्कतेमुळे खूप मोठा अनर्थ टळला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.