आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Travels Fell In Velly Claimed 10 , 35 People Injured At Satara

सातार्‍याजवळ ट्रॅव्हल्स दरीत कोसळून 10 ठार, 35 जण जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - सातार्‍याहून पुण्याकडे निघालेली परराज्यातील एक खासगी बस खंबाटकी घाटात कोसळून त्यातील 10 जण जागीच ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोमवारी रात्री 11 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. त्यात 35 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने सातारा व पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्रीच्या अंधारात मृतांची ओळख पटू शकली नाही.
कन्याकुमारीहून पोरबंदरकडे जाणारी एक खासगी बस सोमवारी रात्री अकराच्या सुमारास सातार्‍याहून पुण्याकडे चालली होती. खंबाटकी घाटातील बोगदा पार केल्यानंतर रस्त्यात असलेल्या एका अपघाती वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटले व ही गाडी दरीत कोसळली. यात दहा जण ठार झाल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. सातारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आहे. रात्रीच्या अंधारात मृतदेह बाहेर काढण्यात मोठय़ा प्रमाणावर अडचणी आल्या. मृत सर्व जण पोरबंदर येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, या अपघातानंतर काही वेळातच याच मार्गावर एका कंटेनरवर एक कार, पीक व्हॅन व अन्य वाहन धडकल्याने चार जण जखमी झाले. त्यांच्यावरही सातार्‍याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.