कोल्हापूर- शनि शिंगणापूर येथील शनी मंदिराच्या चौथऱ्यावर जाऊन पूजा केल्यानंतर आता भूमाता रणरागिणी ब्रिगेडने कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरावर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंना महालक्ष्मी मंदिरात तृप्ती देसाईंना विरोध करण्यात आला आहे. सनातन, हिंदू एकदा, बजरंग दलाचे कार्यकर्ते मंदिरात उपस्थित झाले आहेत.
तृप्ती देसाई शहरातून विजयी रॅली काढून महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळताच हिंदुत्त्ववादी संघटना त्यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. मंदिर परिसरातील दुकाने बंद करण्यात आले आहेत.
महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात जाऊन पूजा करणार होत्या तृप्ती देसाई...
सध्या साडी नेसून गाभाऱ्यात महिलांना पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण मी साडी नेसणार नाही. सलवार कमिज घालून गाभाऱ्यात पूजा करणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केल्याने खळबळ उडाली आहे.
कोल्हापुरच्या राजवाडी पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने तृप्ती देसाई यांना फोन करुन महत्त्वाचा सल्ला दिला आहे. महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात जाताना साडीच नेसा, सलवार कमिझ घालू नका, गाभाऱ्यात महिलांसाठी असलेल्या नियमांचे पालन करा, असे यात सांगण्यात आल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
याबाबत तृप्ती देसाई म्हणाल्या, की मी त्यांना सांगितले, की मी काही शॉर्ट स्कर्ट किंवा जिन्स घालणार नाही. सलवार कमिझ भारतीय पेहराव आहे. मी साडी नेसणार नाही. सलवार कमिझ घालून गाभाऱ्यात प्रवेश करेल.
पुढील स्लाईडवर वाचा, काय आहे पोलिस अधिकाऱ्याचे नाव, काय आहे प्रथा....