आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही काँग्रेसनी शहाणपणाने वागायला हवे : कदम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - राज्य कारभारात केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारे अपयशी ठरली आहेत. पूर्वीचेच सरकार बरे, अशी लोकांची भावना होऊ लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एका विचाराने पुढे यावे, ही लोकांचीच इच्छा आहे. त्यासाठी अहंकार बाजूला ठेवून दोन्ही काँग्रेसनी शहाणपणाने वागायला हवे, असे मत काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी व्यक्त केले.

रविवारी येथे पत्रकारांशी संवाद साधताना कदम म्हणाले, ‘सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. टंचाईच्या काळात आम्ही बजेटचा कधीही विचार न करता शेतकऱ्यांना मदत केली. अधिकारांचे विकेंद्रीकरण केले. पण आज या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी काहीही देणेघेणे नाही. म्हणूनच देशाचे कृषिमंत्री शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करणारी विधाने करत आहेत.