आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भलिंग निदानप्रकरणी दाेन डाॅक्टर, कारचालक ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - व्हॅनमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याच्या आरोपावरून येथील दोन डाॅक्टरांना पाेलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. डाॅ. हर्षल रवींद्र नाईक (वय ३१, कोल्हापूर) व डाॅ. हिंदूराव बाबासाहेब पोवार (वय ३०, रा. शिरगाव, ता. राधानगरी) अशी या डाॅक्टरांची नावे आहेत. त्यांच्या गाडीचा चालक सुशील मारुती दळवी (रा. कांचनवाडी, ता. करवीर) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

बुधवारी रात्री एका आलिशान कारमधून गर्भलिंग निदान चाचणीसाठी मशीन नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. ही गाडी अडवून पोलिसांनी विचारणा केली असता हे गर्भलिंग निदान चाचणीचे मशीन असल्याचे चालकाने सांगितले. तसेच वरील दोन्ही डाॅक्टरांचीही त्याने नावे सांगितली.

महापालिकेचे आरोग्य अधिकारी डाॅ. दिलीप पाटील यांनी याबाबत तक्रार दिली. दोघांनी हे सेकंडहँड मशीन सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथून ६ लाख रुपयांना खरेदी केले होते. आतापर्यंत २० महिलांची चाचणी केल्याची शक्यता असून १३ हजार रुपये प्रत्येकी तो घेत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. हे दोघेही पैसे वाटून घेत असल्याचे समजते. हाॅटेल रसिका गार्डनशेजारील एका कुटुंबाच्या घरी गर्भलिंग निदान चाचणीसाठी जात असताना त्यांना पकडण्यात आल्याचे सांगितले जाते.
बातम्या आणखी आहेत...